उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैलजोडी लोकार्पण

 


पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निधी नावीन्यपूर्ण योजनेतून 50 टक्के अनुदानावर बैलजोडी  लोकार्पण करण्यात आले.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.