यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण

 

मुंबई: सरकारी मालकीच्या यूनियन बँक ऑफ इंडियाने तीन बँकांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. आजच्या आयटी एकत्रीकरणानंतर (इंटिग्रेशन), पूर्वीच्या आंध्र बँकेच्या सर्व शाखा (सेवा शाखा आणि विशेष शाखांसह) यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये पूर्णपणे एकत्रित झाल्या आहेत.

याआधी नोव्हेंबर २०२० मध्ये बँकेने पूर्वीच्या कॉर्पोरेशन बँकेसह आयटी इंटिग्रेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. या कामगिरीसह आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेच्या यूनियन बँक ऑफ इंडियामधील शाखांचे संपूर्ण आयटी एकत्रिकरण पूर्ण झाले आहे. पूर्वीच्या आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचे सर्व ग्राहक विक्रमी वेळेत यूनियन बँकेच्या सीबीएसमध्ये यशस्वीरित्या स्थानांतरीत झाले आहेत. या उपलब्धीसह बँकेने इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, युपीआय, आयएमपीएस, एफआय गेटवे, ट्रेझरी आणि स्विफ्ट या सेवा पूर्वीच्या आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेच्या ग्राहकांसाठी खुल्या केल्या असून याद्वारे ते युबीआयच्या शाखा आणि डिलिव्हरी चॅनल्सद्वारे अखंडपणे व्यवहार करू शकतील. बँकेने यापूर्वीच एटीएम स्विच आणि एटीएम टर्मिनल सहजपणे युबीआय नेटवर्कमध्ये स्थलांतरीत केले आहे. संपूर्ण स्थलांतर विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ग्राहकांना अत्यंत कमी गैरसोय सोसावी लागली. यात ग्राहकांच्या अकाउंट नंबर, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग क्रिडेन्शिअल्समध्येही कोणताही बदल करण्यात आला नाही.

यूनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय जी म्हणाले, “पूर्वीच्या आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा आणि वितरण चॅनल्सचे पूर्ण एकत्रिकरण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. याद्वारे आमच्या ग्राहकांसाठी मोठी संधी खुली झाली असून नवनवीन उत्पादने व सेवांची क्षमताही वाढली आहे.”

Popular posts
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image