जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

 


पुणे :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयातील कॅमेरामन संतोष मोरे व चंद्रकांत खंडागळे यांचा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी गौरव केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, पुणे कॅन्टोनमेंट मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, भोसरी विधानसभा मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी राणी ताटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.