नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओची लस पाजली जात आहे.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज माणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ग्रामीण भागातल्या ७४ हजार २७३, आणि शहरी भागातल्या १३ हजार ३८३ अशा एकूण ८७ हजार ६५६ लाभार्थ्यांना पोलिओची लस दिली जात आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भावनाऋषी नागरिक आरोग्य केंद्र इथं महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. महापालिका आरोग्य विभागानं पॉलिओ लसीकरण मोहिमेसाठी सोलापूर शहरात ३६० केंद्र स्थापन केली आहेत. एकूण १ लाख १० हजार ६९८ बालकांना पॉलिओ लस दिली जात आहे.
वर्धा जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आज वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांना पोलिओचा डोस देऊन करण्यात आला. या मोहिमेकरीता जिल्हयात १ हजार ३४१ लसीकरण केंद्राची व्यवस्था केली असून यामध्ये ग्रामीण भागात १ हजार १३५ तर शहरी क्षेत्रात २०६ केंद्रं आहेत.
यावर्षी ग्रामीण भागात ७९ हजार २०० लाभार्थीना तर शहरी भागात ३० हजार १३१ अशा एकूण १ लाख ९ हजार ३३१ लाभार्थ्यांना पोलीओचा डोस दिला जात आहे. नांदेड तालुक्यात धनेगाव परिसरातल्या विटभट्टी कामगारांच्या बालकांना पोलीओ लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.