सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्री शिक्षणातूनच कुटूंब आणि पर्यायाने समाज पुरोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो, यावर असलेल्या विश्वासामुळेच महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनी त्याचं आयुष्य स्री शिक्षणासाठी वेचलं. त्यामुळेच आज स्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या एकशे नव्वदाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाईंची जयंती यापुढे सावित्रीबाई फुले शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छाही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.