स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषद "प्रारंभ" ही एक तरुणांसाठी संधी - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या होत असलेल्या विविध आभासी कार्यक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

१५ आणि १६ जानेवारीला होणारी स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषद "प्रारंभ" ही अशीच एक संधी असून यात तरुणांनी सहभागी व्हावं असं ट्विट प्रधानमंत्र्यानी केलं आहे.

या शिखर परिषदेत शैक्षणिक, बॅंकींग, गुंतवणूक, उद्योग, वित्त या क्षेत्रातलं तज्ञ तसंच तरुण स्टार्ट अप प्रमुख सहभागी होणार आहेत. स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.