हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची काँग्रेसवर टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या किसान ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी आंदोलनाला राहुल गांधी कायम खतपाणी घालत राहिले असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. देशात अशांतता माजवणे हाच एक कलमी कार्यक्रम काँग्रेस राबवत, असेही जावडेकर म्हणाले.   

मात्र दिल्लीतल्या रॅलीदरम्यान दिल्ली पोलिसांनी दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी पोलिसांची प्रशंसा केली आहे.