राजभवनात ५० निवासी डॉक्टरांचा सत्कार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी सर्वप्रथम कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांना जीवदान देऊन धर्म रक्षणाचं कार्य केलं, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉक्टरांचा गौरव केला.

मनुष्य सेवा हीच ईश सेवा आहे’ त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवून निवासी डॉक्टरांनी एक प्रकारे धर्म वाचविला आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना मार्डच्या वतीनं काल राजभवनात ५० निवासी डॉक्टरांचा सत्कार झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.