राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरणाची स्थापना ; डॉ.दिपक म्हैसेकर यांची विशेषज्ञ अंकन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

 


पुणे : केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्यावतीने राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे . तशी अधिसूचना 12 जानेवारी 2021 ला निर्गमित करण्यात आली आहे. मुंबई महानगर आणि कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्रासाठी तिसरी राज्य विशेषज्ञ अंकन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांची तर श्री. मुकुंद पाठक, श्री. दत्तात्रय थोरात, किरण वसंत आचरेकर, डॉ. असीम गोकर्ण हरवंश सदस्य आहेत तर पर्यावरण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असणार आहेत.

केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीचा कार्यकाल तीन वर्षाचा राहणार असून केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीने प्राधिकरण मदतीचे कार्य करणार आहे. राज्यात उद्योग, खनीज, सिंचन यासबंधी योजनासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरण

श्री. विजय शांतिलाल नाहटा सेवानिवृत्त सनदी अधिकारी अध्यक्ष तर श्री. पंकज मोहन जोशी सदस्य तर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव-हे सदस्य सचिव असणार आहेत.

राज्यात उद्योग, खनीज, सिंचन यासबंधी योजनासाठी पहिली समिती

डॉ विजय कुलकर्णी अध्यक्ष, श्रीमती कविता टकले, मि. कुंदन बालकृष्ण देशमुख , श्री.चंद्रशेखर मराठे , श्री. जीवन वी. पाटगांवकर हे सदस्य आहेत तर राज्याच्या पर्यावरण व जलवायु विभागाचे उप सचिव सदस्य-सचिव असणार आहेत.

मुंबई महानगर आणि कोकणसाठी दुसरी राज्य विशेषज्ञ अंकन समिती

श्री. सुधीर माणिकराव खानापुरे- अध्यक्ष, श्री बांबळे रमेश बालकृष्ण, डॉ. गणेश भीमराव रसाळ, डॉ. नितीन एम. लेभने सदस्य आहेत तर पर्यावरण विभागाचे उपसचिव हे सदस्य -सचिव असणार आहेत.

मुंबई महानगर आणि कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्रासाठी तिसरी राज्य विशेषज्ञ अंकन समिती

डॉ. दीपक म्हैसेकर-अध्यक्ष, श्री. मुकुंद पाठक, श्री. दत्तात्रय थोरात, किरण वसंत आचरेकर, डॉ. असीम गोकर्ण हरवंश सदस्य आहेत तर पर्यावरण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असणार आहेत.