राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ म्हणजेच ६८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

काल सायंकाळी ७ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून, काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते.राज्यात शनिवारी पासून काल पर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात काल ३१२ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली आहे.