"लढा यूथ मूव्हमेंट" चे सावित्रीमाईंना जयंतीदिनी अभिवादन

 


पिंपरी : प्रथम महिला शिक्षिका व महान समाज सुधारक चूल व मूल ही अनिष्ट परंपरा संपवून महिला शिक्षणाचा अधिकार मिळवून देणार्‍या महान ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना 190 व्या जयंती दिनी 'लढा यूथ मूव्हमेंट' च्या वतीने पिंपरी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सरकार कडून सावित्रीमाई फुले जयंती ही यापुढे महिला शिक्षक दिन म्हणून साजरी केली असे जाहीर केले ही बाब अभिनंदनीय आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा अशी अपेक्षा लढा यूथ मूव्हमेंट चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केली.

यावेळी 'लढा यूथ मूव्हमेंट'चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, समाधान कांबळे, धम्मादादा क्षिरसागर, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.