नव्या वर्षानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक नवीन वर्ष नव्या सुरुवातीची संधी देतं, तसंच वैयक्तिक आणि सामूहिक विकासाला चालना देतं , असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
नवीन वर्ष नव्या आशा आणि मिळून मिसळून एकजुटीनं रहाण्याच्या भावना मजबूत करतं असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
नव्या वर्षाचं स्वागत देशवासी दृढता, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या भावनेनं करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सराज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या करोना विरुद्ध सावधगिरी बाळगून आगामी वर्षांत आपण देशासाठी, राज्यासाठी तसंच समाजासाठी अधिक निष्ठेनं आणि समर्पण भावनेनं काम करण्याचा संकल्प करूया, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छादिल्या असून नववर्षात वैयक्तिक आरोग्यासह, इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, आणि समाधान घेऊन येवो, संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊन सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो, असं त्यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.