कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून केंद्र शासनानं मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरुवात करता येऊ शकेल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हिंगोली इथं एका कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते. १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना  लसीकरणाचं प्रशिक्षण दिलं आहे. ज्या कमतरता आहेत त्या केंद्र शासनाला कळवल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.