ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरू करा - प्रजा फाऊंडेशन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे. ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशननं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या. चिडचिडेपणा वाढला, त्यांच्या डोळ्यांच्या समस्या वाढल्या, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

मुलांना शाळेत पाठविण्यासाठी परिस्थिती सुरक्षित असल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे शहराच्या सामाजिक-राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर बराच प्रभाव पडल्याचं जाणवल्यानं या प्रभावाचं नेमकेपणानं विश्लेषण करण्यासाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं.

उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरं आणि परिवहन या महत्त्वाच्या घटकांबात प्रजानं हंसा रिसर्चच्या सहाय्यानं केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष या अहवालात सादर केले आहेत, असं प्रजाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितलं.