गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.