देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत कालपासून प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असून, लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधाचे नियम पाळावे लागतील, असं प्रधानमंत्रींनी नमूद केलं. ‘दवाई भी - कडाई भी’ असा नारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, देशात नवउद्योगांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्रींनी काल एक हजार कोटी रुपये निधीची घोषणा केली. प्रारंभ या स्टार्टअप इंडिया जागतिक परिषदेत ते काल बोलत होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.