नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं शेतकरी नेत्यांना दिला आहे,या दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा केली जाईल,अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली.

कालविज्ञान भवन इथं चर्चेची दहावी फेरी पार पडली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. केंद्राच्या नव्या प्रस्तावावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे.शेतकरी नेत्यांबरोबर सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून उद्या होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान,हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला.या कायद्याच्या प्रत्येक कलमांवर शेतकऱ्यांनी चर्चा करावी आणि सकारात्मक तोडगा काढावा,मात्र हे कायदे रद्द करण्यावर ठाम राहू नये,असं आवाहनही त्यांनी शेतकरी नेत्यांना केलं आहे.