देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून ४०  हजार १८७ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. काल दिवसभरात राज्यात उद्दिष्टाच्या सुमारे ७३ टक्के लसीकरण झाले. 

सर्वाधिक लसीकरण धुळे जिल्ह्यात १११ टक्के झाले असून त्या पाठोपाठ बीड, पालघर, नांदेड, सिंधुदूर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत २ लाख १९  हजार ६९६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी काल दिली.