कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्राची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी

 


पुणे: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्राला मुख्यमंत्री महोदयांचे कोविड विषयीचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. नितीन बिलोलीकर, कोविड-१९ चे मुख्य फिजिशियन डॉ. किरण खलाटे, अधिसेविका श्रीमती जाधवर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाचे लाभार्थी कर्मचारी, लसीकरणाचे टप्पे यासह कोविड लसीकरणासाठीच्या नियोजनाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image
टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव
Image