बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये - रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

रायगड जिल्ह्यात पेण इथे एका बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याप्रकरणी आठवले यांनी काल पेणला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली.

या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी यासाठी आपण गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.