मुंबईत आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्य़ात आलं.  आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या ३लाख ५ हजार ५३१ झाली आहे.

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ४४७ दिवसांवर गेला आहे. सध्या ६ हजार ४४२ रुग्ण उपचार घेत आहेत. काल ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ११ हजार २८५ वर पोचला आहे.