देशात कोविडच्या १३ हजार सातशे ८८ नव्या रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून तो आता ९६ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकंदर एक कोटी ११ लाख कोरोनाबाधित रुग्ण बरेझाले आहेत. दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली आली असून गेल्या २४ तासात कोविडच्या १३ हजार ७ शे ८८ नव्या रुग्णांची नोंद झाली .आहे.

काल दिवसभरात १४ हजार ४०० रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्ण संख्येच्या ५० पट आहे.सध्या देशात विविध ठिकाणी जवळपास दोन लाख बाधितांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी सौम्य किंवा अति सौम्य लक्षणं असलेले ६० टक्के रुग्ण असून ते त्यांच्या घरामध्येच विलगीकरणात आहेत.