उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

  नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

मुंबई : मराठी पत्रकार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून, मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.