ऑटो डिमिंग आयआरव्हीएमसह येणार ‘एमजी हेक्टर २०२१’

 


मुंबई: एमजी हेक्टर २०२१ मध्ये आता ऑटो डिमिंग आयआरव्हीएमची सुविधा आणणार असून त्यात १८ इंचांचे अलॉय व्हील्सदेखील असतील. एमजी हेक्टर २०२१ ही आता कारमधील विविध फंक्शनवर नियंत्रण करण्याकरिता ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स समजून घेऊ शकते व त्याला प्रतिसाद देऊ शकते. ही एसयुव्हीमध्ये एफएम चलाओ, टेम्परेचर कम कर दो यासारख्या कमांड्स असतील.

एमजी हेक्टर २०२१ मध्ये अनेक पर्याय आहेत. उदा. सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर. हेक्टर २०२१ मध्ये वायरलेस चार्जिंग, फ्रंट व्हँटिलेटेड सिट्स (फर्स्ट इन सेगमेंट). एमजी हेक्टर २०२१ मध्ये ड्युएल टोन बेज व ब्लॅक इंटेरिअरचा पर्याय असून याद्वारे केबिनमध्ये आणखी हवेशीर व प्रीमियम अनुभव येईल.

एमजी मोटर इंडियाबद्दल:

१९२४ मध्ये ब्रिटनमध्ये स्थापन मॉरिस गॅरेज वाहन ही आपले स्पोर्ट्स कार, रोडस्टर्स आणि केब्रियोलेट सीरीजसाठी जगप्रसिद्ध होते. ब्रिटिश पंतप्रधानांसह शाही घराण्यातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींमध्ये स्टाइल, एलिगन्स आणि स्पिरिटेड परफॉर्मन्ससाठी एमजी वाहनांना मोठी मागणी होती. ब्रिटनमधील एबिंगडन येथे १९३० मध्ये स्थापन झालेल्या एमजी कार क्लबचे हजारो निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे कार ब्रँडसाठी जगातील सर्वात मोठ्या फॅन क्लबमध्ये या कारचे क्लब समाविष्ट आहे. एमजी मागील ९६ वर्षांमध्ये एक आधुनिक, फ्यूचरिस्टिक आणि इनोव्हेटिव्ह ब्रँडच्या रुपात विकसित झाला आहे. एमजी मोटर इंडियाचा गुजरातमधील हलोल येथे स्वत:चा कार निर्मिती प्रकल्प आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ८०,००० वाहनांची असून तेथे जवळपास २,५०० कामगार आहेत.सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड आणि इलेक्ट्रिक) मोबिलीटी, या ध्येयाने प्रेरित असलेल्या आधुनिक कारनिर्मात्याने आजच्या वाहन क्षेत्रात अनेक उत्तम अनुभव संपादन केले आहेत. भारतातील पहिली इंटरनेट एसयुव्ही- एमजी हेक्टर, भारतातील पहिली प्युअल इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही- एमजी झेड एस ईव्ही आणि भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयुव्ही- एमजी ग्लॉस्टर यासह अनेक ‘फर्स्ट’ उत्पादने कंपनीने या क्षेत्रात सादर केले आहेत.