पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधे राज्यातल्या सहा जणांचा समावेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राज्यातल्या ६ जणांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना हा नागरी सन्मान मिळाला आहे. पाच जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं असून त्यात सामाजिक कार्यासाठी सिंधुताई सपकाळ आणि गिरिष प्रभुणे, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नामदेव चंद्रभान कांबळे, कला क्षेत्रासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना, तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जसवंतिबेन जमुनादास पोपट यांना हा नागरी सन्मान मिळाला आहे.