केंद्रीय समाज कल्याण खातं सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार असल्याचं रामदास आठवले यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारचं समाज कल्याण खातं अधिक सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे, अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज नाशिकमधे बातमीदारांशी बोलत होते. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना तयार केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण करायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही, मात्र सध्या ती वेळ नाही, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामकरणाचं राजकारण केलं जात आहे, असं आठवले म्हणाले .

केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत. कायद्यात सुधारणा करणे ठीक पण कायदेच मागे घ्या ही मागणी सयुक्तिक नाही, असंही ते म्हणाले.