संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयके सादर होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या सकाळी अकरा वाजता संसदेत सादर केला जाणारआहे. या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्यासर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 
३८ विषय चर्चेसाठी घेतले जाणार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल सांगितले. यामध्ये ३३ विधेयकेआणि पाच अर्थविषयक मुद्द्यांचा समावेश आहे.