हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

  हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्रीमती श्वेता सिंघल आणि श्रीमती प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image