रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली आहे. याबाबत काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नसून प्रवासी शुल्कात वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन देखील नसल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांनी अशा तथ्यहीन, निराधार बातम्या प्रकाशित करू नयेत, असंही रेल्वेनं सांगितलं आहे.