मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ओलांडला ५० हजाराचा ऐतिहासिक टप्पा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकान आज ५० हजाराचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला.

दिवसभरात ३३४ अंकांची उसळी घेत निर्देशाकांनं ५० हजार १२६ अंकांची पातळी गाठली मात्र दिवसअखेर ५६० अंकांची घसरण नोंदवत तो ४९ हजार ६२५ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज ५४ अंकाची घसरण झाली आणि  तो १४  हजार ५९० अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टीनंही ९३ अंकांची वाढ नोंदवत १४ हजार ७३८ च्या पातळीला स्पर्श केला.