देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.

काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८ नवे कोरोनाबाधित आढळले.

आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ कोटी ३ लाख ७४ हजाराच्या वर गेली आहे. त्यापैकी आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ९९ लाख ९७ हजार २७२ वर पोचली आहे.

सध्या देशात सुमारे २ लाख २७ हजार सक्रीय रूग्ण आहेत. तर मृत्यूदर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे.

काल देशात नऊ लाखांपेक्षा जास्त कोविड नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून १८ हजार ८८ नवीन रुग्ण आढळले आहेत असं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image