अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

  अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत श्री.मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, विभागाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणारी 2388 अनुदानित वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलींसाठी 578 व मुलांसाठी 1810 अनुदानित वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांची एकूण मान्य विद्यार्थी संख्या 99 हजार 552 इतकी आहे.

या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत व अन्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाशी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image