दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली.

वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

जगभरातले माजी खेळाडू, पत्रकार माध्यमकर्मी यांची आयसीसी वोटिंग अकॅडमी ही स्वतंत्र संस्था स्थापण्यात येणार असून चाहत्यांनी केलेल्या मतदानावर आधारित उत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंची निवड करण्यात येईल. यांत जुने जाणते खेळाडू आणि नवोदित खेळांडूचाही समावेश असणार आहे.