९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथं होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २६ मार्चपासून सुरू होणार ‘रंग’ हे संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर, आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडलं जाईल, तसंच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.