मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा 2 तास सवलत

 


पुणे : दिनांक 15 जानेवारी व दिनांक 20 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता मतदानाचा हक्क बजावण्याकरिता कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2 तास सवलत देणेबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी सर्व आस्थापना,दुकाने,कारखाने यांनी करावी असे आवाहन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेमार्फत करण्यात येत आहे.