मुंबई(वृत्तसंस्था): नाशिक विभागात काल ८१०, तर आतापर्यंत २ लाख ४६ हजार ४३३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. नाशिक विभागातील ५ जिल्ह्यात काल ७१५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दोन लाख ५६ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. सध्या विभागात चार हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ४ हजार ८५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात काल ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ८३२ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल १५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्णसंख्या १४ हजार ४०७ वर गेली आहे. सध्या १८८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३८७ रुग्ण दगावले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात ५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, त्यामुळे आतापर्यंत ३ हजार ४०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल १३ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, एकूण रुग्ण संख्या 3 हजार ५०५ वर पोचली आहे. सध्या ५० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
नांदेड जिल्ह्यात काल ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २६३ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल ३९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून २१ हजार ३१९ झाली आहे. सध्या २८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ५७२ रुग्णांचा बळी गेला आहे.
वाशिम जिल्ह्यात काल ७, तर आतापर्यंत ६ हजार २१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ३ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा ६ हजार ६२५ वर गेला आहे. सध्या २६२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १४८ रुग्ण दगावले आहेत.
जालना जिल्ह्यात नऊ रुग्ण या आजारातून मुक्त झाले जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत काल तेरा नवे रुग्ण आढळले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १३ हजार ९१ झाली आहे सध्या ३०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात काल बरे झालेल्या १६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवलं. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ५७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्णांचा आकडा ९ हजार १७४ वर गेला आहे. सध्या १३७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३२८ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
परभणी जिल्ह्यात काल १४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. जिल्ह्यात या आजारातून ७ हजार १६२ रुग्ण बरे झाले आहेत. काल ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्णसंख्या ७ हजार ५७५ वर गेली आहे. सध्या ११० रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३०३ रुग्णांचा बळी गेला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.