कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात जन्मनेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी मोदी यांनी नागरिकांनी देशभरतून पाठवलेली पत्र, आणि माय जीओव्ही अॅप, तसंच दूरध्वनीवरून पाठवलेल्या संदेशांचा उल्लेख करत, त्यातली प्रेरणादायी उदाहरणं नागरिकांसमोर मांडली. यावेळी मोदी यांनी कोल्हापूरातल्या अंजली आणि मुंबईतल्या अभिषेक यांचाही उल्लेख केला. नव्या वर्षाच्या निमित्तानं देशाला शुभेच्छा द्याव्यात, या कोल्हापुरातल्या अंजली यांनी मांडलेल्या सूचनेचा त्यांनी उल्लेख केला.

२०२१मधे, भारत यशाची नवी शिखरं पादाक्रांत करेल, संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि भारताचं स्थान अधिक सशक्त व्हावं यापेक्षा दुसरी कोणतीही इच्छा मोठी नाही असं ते म्हणाले. कोरोना काळात देशातल्या नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला, आणि ते भारतात उत्पादित झालेल्या वस्तुंची मागणी करू लागले, हा मोठा बदल असून, त्याचं मूल्यांकन करणं सोपं नाही असं ते म्हणाले.

विशाखापट्टणम इथल्या व्यंकट मुरलीप्रसाद यांचं उदाहरण देत आत्मनिर्भर भारतासाठी नागरिकांनी, आपण वापरत असलेल्या परदेशी वस्तुंच्या देशी पर्यायांची यादी तयार करावी आणि भारतातल्या कष्टकरी लोकांनी तयार केलेली उत्पादनेच खरेदी करायचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. नागरिक अशा तऱ्हेनं आत्मनिर्भर भारताच्या संकल्पेला पाठिंबा देत असल्यानंच, व्होकल फॉर लोकल हा मंत्र घराघरात गजबजू लागला आहे, त्यामुळे आपली उत्पादने जागतिक दर्जाची असतील याची सुनिश्चिती करणं ही देशातल्या उत्पादक आणि उद्योजकांची जबाबदारी असल्याची जाणिव मोदी यांनी आजच्या मन की बातमधून करून दिली.

याच वर्षी काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच जीआय टॅग मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे काश्मीरी केशरची निर्यात वाढेल आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारताला बळ मिळेल असं ते म्हणाले. देशभरात २०१४ ते १८ या काळात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यानं वाढली, त्यासोबतच वाघ आणि सिंहांची संख्या तसंच वनक्षेत्रही वाढल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारसोबत नागरिक आणि इतर संस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.

अत्यंत संवेदनशीलतेनं प्राण्यांची सेवा करत असलेल्या व्यक्तींची उदाहरणं देत त्यांनी अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. एकदाच वापरायच्या प्लास्टिकपासून देशाला मुक्त करणं, हा नव्या वर्षासाठीच्या संकल्पांपैकीच एक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मोदी यांनी यावेळी मोदी यांनी सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी झटत असलेल्या व्यक्तींची उदाहरणंही नागरिकांसमोर मांडून, आपण कचरा करणारच नाही, असा संकल्प करायचं आवाहन केलं.

आजच्या मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी गीता हा ग्रंथ उद्भूत का आहे हे उलगडून सांगत, मनातली जीज्ञासा जोपासण्यामागचं महत्वही विषद केलं. आपल्या मनातली जीज्ञासाच आपल्याला नव्या कामासांठी प्रेरणा देते असं ते म्हणाले. आपली संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी गुरु गोविंदसिंग, गुरु गोविंद यांचे पुत्र, साहिबाजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंग, मोतोश्री गुजरी यांच्या बलिदानाची आठवणही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे केली.

श्रीगुरू तेग बहादुर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त दिल्लीतल्या रकाबगंज इथल्या गुरुद्वारात गुरु तेग बहादुर यांच्यापुढे नतमस्तक व्हायची संधी मिळाल्याचं सांगून, या सगळ्यांच्या बलिदानाला आपण नमन करत असल्याचं ते म्हणाले. देशभरातल्या शिक्षकांनी कोरोनाकाळात वापरलेल्या अभिनव पद्धती आणि शिक्षण सामग्री दीक्षा पोर्टलवर अपलोड करायचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या युवकांमधे ‘करू शकतो ' हा दृष्टिकोन आणि 'करेन' ही भावना असल्यानं  त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नसल्याचं ते म्हणाले.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image