मुंबई: शेअर बाजाराच्या प्रवाहात अधिकाधिक मिलेनिअल्सना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने डिजिटल-फर्स्ट ब्रोकर एंजल ब्रोकिंगने 'एक नवी सुरुवात' (एक नई शूरुआत) मोहिमेची सुरुवात केली आहे. या सर्वंकष विपणन मोहिमेत पहिल्यांदा गुंतवणूक करणा-या मिलेनिअल्सवर लक्ष केंद्रीत केले जाईल. ‘एक नई शुरुवात’ ही मोहीम फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, न्यूज आउटलेट्स, एंजल ब्रोकिंग वेबसाइट आणि मोबाइल ट्रेडिंग अॅप यासारखे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच यूट्युब आणि जिओ टीव्हीसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चालवले जाईल.
एंजल ब्रोकिंगचे सर्व डिलिव्हरी ट्रेड्स मोफत आहेत. या अत्याधुनिक स्टॉकब्रोकरने एक समर्पित इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले असून याद्वारे आपल्या दैनंदिन ट्रेड्सना मदत केली जाते. एवढेच नव्हे तर ही संपूर्ण प्रक्रिया एक बटणाच्या स्पर्शाद्वारे करता येईल एवढी सोपी केली आहे. दरम्यान, अधिक उत्पन्नाची हमी देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्ट मनी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना ट्रेडर म्हणून ग्रॅज्युएट करण्यासाठी मदत केली जाते. गुंतवणुकदारांच्या वेगानुसार लर्निंग मोड्युल्स त्यात दिलेले असतात.
एंजल ब्रोकिंगचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ एंजल ब्रोकिंग नेहमीच नूतनाविष्कारात आघाडीवर असते. भारतीय रिटेल क्षेत्रात सहभाग वाढवण्यासाठी सक्रीय असते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच आम्ही नवे प्रयोग केले असे नाही तर एकूणच कॉस्ट-इफेक्टिव्ह प्रायसिंग आणि यूझर फ्रेंडली प्लॅटफॉर्मसह एकूण मूल्यातच प्रगती केली. आम्ही सर्वच स्टेकहोल्डर्ससाठी बाजारात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध केली. यात ट्रेडर्स, रेग्युलर इन्व्हेस्टर्स आणि पहिल्यांदाच गुंतवणूकदार करणारे इत्यादींचा सहभाग आहे. ‘एक नई शुरुआत’ या मोहिमेद्वारे, आम्ही भारतातील नवोदित मिलेनिअल्सपर्यंत हा मौल्यवान प्रस्ताव पोहोचवण्याचा उद्देश बाळगून आहोत. जेणेकरून २०२१ मधील त्यांचा प्रवास अधिक तेजस्वी होईल.”
एंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री. विनय अग्रवाल म्हणाले, 'अर्थव्यवस्थेच्या इतिहासात, भांडवलीय बाजार हा फक्त आकार आणि मूल्यात विस्तारला आहे. मोठ्या प्रमाणावर नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा पुरवतानाच हीच गोष्ट लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. आमचा तंत्रज्ञानप्रणित दृष्टीकोन ग्राहकांसाठी खूप सकारात्मक परिणाम देतो. “एक नई शुरुआत” मोहिमेच्या माध्यमातून २०२१ मध्ये हेच परिणाम मोठ्या प्रमाणात पाहण्याचा आमचा हेतू आहे.'
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.