सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित केलेल्या जागतिक आयआयटी परिषदेत बोलत होते.

भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला सरकार प्रोत्साहन देत असून देशातल्या आयआयटी अर्थात तंत्रज्ञान संस्था मजबूत करण्यासाठी सरकार दक्ष आहे. तरुण तंत्रज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक समस्यांवर चांगले उपाय पुढे आणत आहे.

त्यामुळेचं कोविड १९ च्या कसोटीच्या काळात भारतात विक्रमी गुंतवणूक झाली असून त्यापैकी मोठी गुंतवणूक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झाली असल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे.