आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचं निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेली दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. ते पालघर जिल्ह्यातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज पालघर जिल्ह्यात वाडा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.