ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी ही विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली होती, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. दरम्यान, देशात या नव्या विषाणूचे २० रुग्ण आढळले आहेत.