नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनाचे स्मरण करून देतो - भगतसिंह कोश्यारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण करून देतो.

येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि  संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी वर्ष २०२१ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.