ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.यापैकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत,दोन रुग्णांना हैदराबादच्या सीसीएमबी आणि एका प्रवाशाला पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे.या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा आणि सह प्रवाशांचा तपास सुरु आहे.

ब्रिटन इथून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात देशाच्या विविध विमानतळांवर अंदाजे ३३ हजार प्रवासी आले असून,या सर्व प्रवाशांची ते राहत असलेल्या राज्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे.आतापर्यंत या प्रवाशांपैकी एकूण एकशे चौदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.