राज्यात आतापर्यंत १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४ हजार १२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यात कोरोनामुक्तीचं प्रमाण ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के झालं आहे. काल ३ हजार १०६ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर, ७५  रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत १९ लाख २ हजार ४५८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी  एकूण १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर, ४८ हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ५८ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यातला कोविड मृत्यूदर २ पूर्णांक ५७ शतांश टक्के आहे. 

आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी २२ लाख १२ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २ हजार ४५८, म्हणजे १५ पूर्णांक ५८ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ८१५ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर ३ हजार ६६० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल ३, तर आतापर्यंत ३ हजार ३८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातली एकूण संख्या ३ हजार ४६४ झाली आहे. सध्या २७ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १५४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल ९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला, त्यामुळे रुग्ण संख्या ६ हजार ५४१ वर गेली आहे. सध्या २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात  काल १२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल १३ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ४९६ झाली आहे. सध्या १२१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे २९९ रुग्ण दगावले आहेत.

जालना जिल्ह्यात काल ४० रुग्णांना बरे झाल्यानं घरी पाठवलं. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३७ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून १२ हजार ९६२ झाली आहे. सध्या २९८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

नाशिक जिल्ह्यात काल ३८२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल २३३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, बाधितांची संख्या ७० हजार ७८८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ५३३ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ९३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात काल ३०५, तर आतापर्यंत १ लाख १२ हजार ७०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल  ३४१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ६२८ इतकी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात काल ४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ७५ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल ६० नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्णांचा आकडा २१ हजार १४९ वर गेला आहे. सध्या ३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ५६५ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.