दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या.

कर्णधार अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी करत कारकिर्दीतले १२वे शतक झळकावले.

आज दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या १ बाद ३६ धावसंख्येवरून आपला पहिला डाव सुरु केला. मात्र सकाळच्या सत्रात भारताने शुभमन गील आणि चेतेश्वर पुजारा यांना झटपट गमावले. हनुमा विहारी आमि ऋशभ पंत यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. या दोघांनाही भारताने दुसऱ्या सत्रात गमावले.

तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला भारताचा एकही गडी बाद करता आला नाही. कर्णधार रहाणेनं रविंद्र जडेजासोबत नाबाद शतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. आज खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे १०४ आणि रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत होते.

ऑस्ट्रेलियाच्या वतीनं मिशेल स्टार्क आणि पॅट कमीन्सनं प्रत्येकी दोन, तर नॅथन लायनय यानं एक बळी मिळवला.