शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना त्यांच्या बलिदानदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. प्रधानमंत्र्यांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलिस यंत्रणा नियुक्त करण्यात आली नव्हती, तसंच वाहतूक यंत्रणेतही कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचा काल शहीद दिन होता. गुरू तेगबहादूर यांच्या समाजासाठीच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचं स्मरण करत कालही प्रधानमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं होतं.