राज्याचा कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्क्यांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ४३१ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख तेरा हजार ३८२ झाली आहे. काल ७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार १२९ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे.

काल एक हजार ४२७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख सहा हजार २९८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.