शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढील तारीख ठरवावी - केंद्राचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकार बरोबरच्या चर्चेची पुढील तारीख ठरवावी अस आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे . कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अगरवाल यांनी याबाबत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिहलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यातील सर्व आक्षेपाच्या मुद्द्यावंर चर्चा करण्याच आवाहन केल आहे. सरकार सर्व आक्षेपांवर सविस्तर चर्चा करून हे मुद्दे सोडवण्यास इच्छूक असून, याबाबत बैठक आयोजित करायला तयार आहे. सरकारने अन्य शेतकरी संघटनांशी चर्चा करून त्यांना कायद्यातील वादग्रस्त मुद्द्यांवर उपाय सुचवण्यास सांगितल आहे, असही अगरवाल यांनी पत्रात नमूद केल आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये याआधी झालेल्या चर्चेच्या सहा फेऱ्यांमधून कुठलाही तोडगा निघू शकला नव्हता.