महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘एनसीआरबी’नं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे.

राजधानी दिल्लीत महिला अत्याचाराचे 12 हजार 92 गुन्हे नोंदले गेले तर मुंबईत 6 हजार 519 गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूरमध्ये अशा गुन्ह्यांची 1 हजार 144 प्रकरणे नोंदली गेली.

नागपूरमधील गुन्हेगारीचा दर मुंबईपेक्षाही अधिक असल्याचं दिसून आलं आहे. एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 13 पूर्णांक 7 शतांश टक्के इतकं असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image