सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह ऍप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह ऍप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहज उपयोग करता येईल हे पाहावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
ते काल माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महानेटद्वारे मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातले शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्याशीही संवाद साधला.
माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांना उत्तम सोयी-सुविधा आणि सेवा मिळणं यासाठी व्हावा, त्याकरिता तितकी सक्षम तांत्रिक यंत्रणा असली पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आवश्यक ते मनुष्यबळ यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
सध्या आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांमध्ये डिजिटल सेवा उत्तमरीत्या मिळतात का ते पाहणं गरजेचं आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेलीमेडीसीनचं आगामी काळातलं महत्व लक्षात घेऊन या सुविधेची व्याप्ती वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली.
शासन-प्रशासनाच्या कामाची गती वाढावी, आणि अचूकता यावी, यासाठी मंत्रालय तसंच जिल्हा स्तरावर ई फाईलिंगसंदर्भात तातडीनं पावलं उचलावीत, असं सांगून ही यंत्रणा नव्या वर्षात प्रभावीपणे काम करेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.